Viral video: जगभरात दररोज शेकडो रस्ते अपघात होतात. काही अपघात अत्यंत गंभीर तर काही अत्यंत किरकोळ असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अपघाताचा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक ऑटोरिक्षाच एका भीषण अपघाताचा बळी ठरली आहे. समोर दुभाजक नव्हता की ऑटोला इतर कोणत्याही वाहनाने धडक दिली नाही. कोणतेही कारण नसताना ऑटो स्वतःहून कशी हवेत उडाली हे काही समजलं नाही.मात्र भीषण अपघात झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खड्डे नाहीत, आजूबाजूची वाहनेही वेगात धावत आहेत. त्यामुळे रिक्षाचा अपघात कसा झाला असा प्रश्न आहे..

दरम्यान या व्हिडीओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, रिक्षाचं एक चाक अचानक निघाल्यामुळे हा अपघात झाला आहे. यावेळी रिक्षाचा तोल गेला आणि रिक्षा हवेत उडून पलटी झाली. हा अपघात पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. हा अपघात कसा झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ना ऑटो डिव्हायडरला धडकली ना त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आला. मग अचानक ऑटो कशी उलटली.पण नंतर टायर निघाल्याचं कळल्यावर अपघाताच कारण समोर आलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: बाथरुममध्ये आरामात उभा होता व्यक्ती; मागे पाहताच दिसलं भयानक भूत, पुढे घडलं असं की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @tausifahmad0 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.