Viral video: लग्नाचा सीजन असो वा नसो, परंतु सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.कधी-कधी लग्नात आलेले पैपाहुणे सुध्दा लोकांचं अधिक मनोरंजन करतात. लग्नात काहीवेळेला चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर देखील अनेकांचे लग्न सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. फक्त नवरा नवरी नव्हे तर त्यांचं कुटुंब, आणि मित्रमंडळी सगळे हटके गोष्ट करून व्हायरल होत आहेत. सध्या एका लग्नसोहळ्यातील भटजी बुवांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भटजी बुवांचा व्हिडिओ व्हायरल

लग्नात मुख्य लग्न लावून देणारा व्यक्ती म्हणजे भटजी, त्यांनी गायलेल्या मंगलाष्टकाने लग्न जुळून येते. सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका लग्नाची मंगलाष्टके सुरु आहेत. मंगलाष्टकामध्ये व्हायरल होण्यासारखं नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यात लग्न लावणारे गुरुजी चक्क प्रेमाची हिंदी गाणी बोलत आहेत. हे एकूण सगळेच शॉक झाले आहेत, तर पाहुण्यांना हसू आवरत नाहीये. एक पुजारी इतर लोकांसोबत लग्नाच्या मंडपात बसला आहे. वधूही ‘हवनकुंडा’जवळ बसलेली दिसतेय. श्लोक किंवा मंत्र म्हणण्याऐवजी, पुजारी अचानक एक बॉलिवूड गाणे म्हणू लागतात. ‘तुझे अपना बनाने की कसम खायी है…’ असं या गाण्याचं नाव असून पुजाऱ्याचा हा फिल्मी अंदाज पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – एकाच बाईकवर तीन जण विनाहेल्मेट करत होते स्टंटबाजी, दुभाजकला धडकले अन् जागीच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी या गुरुजींचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी निदान तुम्ही तरी आपल्या संस्कृतीचा मान ठेवा असे म्हणत टीका केली आहे.