scorecardresearch

Video: पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करताना घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

वेगाने बाइक चालवत पोलिसांना चकमा देणे एका तरुणाच्या कसे अंगलट आले पाहा

Video: पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करताना घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा
पोलिसांना चकमा देण्याचा अयशस्वी प्रयत्नाचा व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जावे यासाठी पोलिसांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा नियम आपल्याच सुरक्षेसाठी बनवले आहेत हे काहींच्या लक्षात येत नाही, त्यामुळे ते हवे तसे नियमांचे उल्लंघन करतात. तर काहीजण नियमांचे उल्लंघन केल्यानंतरही किंवा एखादा गुन्हा केल्यानंतरही पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करतात. मग अशावेळी पोलिसांना कठोर कारवाई करावी लागते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका बाइकस्वाराचा पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. कदाचित काही गुन्हा करून किंवा नियमाचे उल्लंघन करून हा माणूस पोलिसांना चकमा देत आहे हे व्हिडीओ पाहताना समजते. पोलिस आपल्याला पकडु नये यासाठी हा माणूस अतिशय वेगाने बाइक चालवत आहे. कदाचित हा बाइकर ‘गोप्रो’ कॅमेऱ्यामध्ये ही घटना रेकॉर्ड करत आहे. वेगाने बाइक चालवत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते.

आणखी वाचा: मॅच पाहताना चुकीची प्रतिक्रिया दिली अन्…; चिमुकल्याचा गोंडस Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Viral: संतप्त रानगव्यांनी गाडीला धडक दिली अन्…; जंगल सफारीदरम्यान केलेल्या चुकीमुळे काय झाले एकदा पाहाच

वेगाने बाइक चालवत असतानाच एका ठिकाणी कार वळण घेत असताना बाइक त्यावर आपटते आणि अपघात होतो. हा अपघात बाइकरच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत होता, म्हणूनच ही शिक्षा मिळाली’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 14:12 IST

संबंधित बातम्या