Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कधी कधी काही पुरुष महिलांपेक्षाही खूप सुंदर डान्स करतात. हुबेहूब महिलांसारख्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभावही अगदी एखाद्या महिला डान्सरला लाजवतील इतके सुंदर असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो खूप छान डान्स करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका कार्यक्रमामध्ये ‘ओ साकी साकी रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तरुण करत असलेला डान्स कमालीचा असून त्याने केलेल्या डान्स स्टेप्सही खूप भन्नाट आहेत. त्याचा हा डान्स सध्या सोशल मीड्यावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gauravsitoulaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “नोराचा धाकटा भाऊ”, तर दुसऱ्याने लिहिलंय, “एक नंबर डान्स”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान, अतिशय सुंदर भावा.”