Viral Video: आजच्या काळात सोशल मीडियाचे महत्त्व खूप वाढले आहे. अनेकांचे आयुष्यच सोशल मीडियामुळे घडू लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध व्हिडीओ शेअर करणे, अभिनय करणे, डान्स, गाणी यामुळे घरबसल्या लोक लाखो रुपये कमवत आहेत. शिवाय यामुळे त्यांना प्रसिद्धीदेखील मिळत आहे. याचेच आकर्षण आता नव्या पिढीतही पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. यापैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा अभिनय करताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला सध्या खूप ट्रेंडिंग असलेल्या ‘कल्टी मार’ या मिक्स गाण्यावर अभिनय करताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओला खूप पसंती दिली जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @samairathapa.official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “भावा राडाच केलास” आणखी एकाने लिहिलेय, “नुसता धुरळा” आणखी एकाने लिहिलेय, “आईशप्पथ काय हावभाव आहेत.”