Viral Video: नात्यांमध्ये प्रेमासह रागावर नियंत्रणही ठेवता आलं पाहिजे. अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक तरुण त्याच्या प्रेयसीला माराहाण करताना दिसत आहे.
आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावीत, आपली काळजी घ्यावी, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. पण, कधी कधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कॉलेजमधील प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटायला येते. यावेळी दोघांमध्ये वाद होतो ,ज्यावरून प्रियकर हातात काठी घेऊन प्रेयसीला मारहाण करतो. त्यानंतर तो तिला तिथून जायला सांगतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @maharastrin_top_models या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. एकानं लिहिलंय, “ज्याला प्रेम मिळतं, त्याला जपता येत नाही”, दुसऱ्यानं लिहिलंय, “काय भावा, कधी त्या पोरीच्या बापानं हात उचलला नसेल रे”, आणखी एकानं लिहिलंय, “खरं प्रेम नेहमी चुकीच्या व्यक्तीवरच का होतं.”