Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु, आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण, आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.
साधेपणात सौंदर्य असतं हे सोशल मीडियावरील अनेक व्हायरल व्हिडीओंमधून आपण पाहतो. काही लोकांच्या वागण्यात, बोलण्यात, सादर करत असलेल्या कलेमध्ये खूप साधेपणा आणि आपलेपणा असतो; जो पाहणाऱ्यांना हवाहवासा वाटतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एक जोडी साधेपणाने डान्स कसा करायला हवा हे शिकवताना दिसतेय. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कपल सुंदर आणि साध्या पद्धतीने डान्स कसा करायला हवा हे शिकवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते “कब तक चूप बैठे’ या गाण्यावर शिकवत असलेला डान्स खूप सुंदर असून त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhawesh_yadav04 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “खूपच सुंदर केला डान्स”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, ” दादा-वहिनी काय नाचलात तुम्ही, खूप छान”; तर तिसऱ्याने लिहिलंय की, “धन्यवाद, मी पण माझ्या बायकोबरोबर असाच डान्स”