Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती अफलातून डान्स करताना दिसतेय.

लहान मुलं कोणतीही कला पटकन आत्मसात करतात. गाणं, डान्स, अभिनय किंवा इतर कोणतीही कला असो ते खूप लवकर शिकतात. शिवाय त्यांना लहान पणापासूनच आपल्याला कोणत्या गोष्टींची आवड आहे हे कळते आणि त्यानुसारच ते आपलं भविष्य घडवण्यासाठी तयार असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकली एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘खनखन चूडी खनके’ या हिंदी गाण्यावर खूपच सुंदर डान्स करत आहे. यावेळी तिच्या एकापेक्षा एक हटके डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kavyadancer123 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “खूपच सुंदर डान्स करेतय ही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मोठी होऊन खूप मोठी स्टार होणार”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “छोटा पॅकेट बडा धमाका”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर डान्स”