Viral Video: आपण अनेकदा समाजमाध्यमांवर मजेशीर व्हिडीओ पाहतो. त्यातील प्राण्यांचे व्हिडीओ अनेकदा खूप मजेशीर असतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात की, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून अनेक जण व्हिडीओतील व्यक्तीला ट्रोल करताना दिसत आहेत.

कुठल्याही प्राण्याला मारहाण करणे कायद्याने गुन्हा समजला जातो. पण, तरीही अनेक लोक प्राण्यांना अमानुषपणे मारहाण करतात. अशा प्रकारचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये एक पोलिस बैलाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ x (ट्विटर)वर @janabkhan08 या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या वेळी भररस्त्यात एक पोलिस अधिकारी बैलाला अमानुषपणे मारहाण करीत आहे. तसेच त्या पोलिसाला साथ देत, काही गावकरीदेखील त्या बैलाला काठीने मारताना दिसत आहेत. यावेळी संतापलेला बैलदेखील काही वेळाने त्यांच्या अंगावर धावून जातो; पण तरीही ते थांबता, त्याला मारहाण करीत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध हॉटेलची मोठी चूक… ऑर्डर केली व्हेज थाळी, पण आलं काही भलतंच; VIDEO पाहून व्हाल चकित

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओसोबत खाली कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘एक बैल पोलिस अधिकाऱ्याच्या मागे लागला. बहुतेक त्या बैलाच्या तक्रारीची नोंद झालेली नाही. त्यामुळे बैलानं सरळ पोलिस अधिकाऱ्यावरच हल्ला केला. बैलानं पोलिस अधिकाऱ्याला पळविल्याचा व्हिडीओ व्हायरल.’ ही कॅप्शन जरी गमतीशीर लिहिली असली तरी या व्हिडीओवरील कमेंट्समध्ये युजर्स खूप संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलेय, “बहुकेत पोलिस अधिकारी विसरलेत की त्यांचं काम रक्षण करणं आहे; मुक्या जनावरांना मारणं नाही.” तर, दुसऱ्या एकाने लिहिलेय, “अशा प्रकारे प्राण्यांना मारणं खूप मोठा गुन्हा आहे.” तर, आणखी एकाने लिहिलेय, “मुक्या प्राण्याला अशा प्रकारे त्रास देऊ नका. देव तुम्हाला क्षमा करणार नाही.”