Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. असं म्हणतात की, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. त्याशिवाय मुलीदेखील आपल्या वडिलांना खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतात, वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मुलीसाठी खूप खास आणि लाखमोलाची असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

एक वेळ एखादा पुरुष आपल्या बायकोनं सांगितलेल्या काही गोष्टी ऐकत नाही; पण आपल्या लाडक्या लेकीनं सांगितलेल्या अनेक गोष्टी मागचा-पुढचा विचार न करता, लेकीच्या आनंदासाठी करतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही हाच क्षण पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर डान्स करत असून, यावेळी ती हा डान्स तिच्या वडिलांना शिकविताना दिसतेय. यावेळी तिचे बाबा डान्स स्टेप्स चुकतात. त्यामुळे ती पुन्हा त्यांना तिच्या पद्धतीने शिकवते. बाप-लेकीचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @just_ramesh_things या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बापाला सर्वांच्या तालावर नाचायला लागतं”. आणखी एकाने लिहिलेय, “बापाचा सुंदर हिरा”. आणखी एकाने लिहिलेय, “खूप गोड”.