कुत्र्याला माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणतात. त्याला कारणंही तसंच आहे. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सध्या एक कुत्रा आणि माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील कुत्र्याने एका बेघर माणसाला मिठी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या इमोशनल व्हिडीओने लोकांचं हृदय पिळवटून गेलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ ३० डिसेंबर रोजी बुइटेंजेबिडेन यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता आणि आतापर्यंत या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बेघर माणूस रस्त्यावर बसलेला दिसत आहे. पलीकडे बघत असलेल्या माणसाकडे एक कुत्रा आला आणि थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. काही सेकंदांनंतर, हा कुत्रा त्या अनोळखी व्यक्तीला धीर देण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं त्याला घट्ट मिठी मारू लागला. त्या माणसानेसुद्धा कुत्र्यालाही मिठी मारली आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांना मिठी मारत एकमेकांना आधार देत राहीले. ‘हा कुत्रा एका बेघर माणसाकडे जातो आणि त्याला मिठी मारतो.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा : वरातीत नवरदेवाला पाहिलं आणि खिडकीतच उभी राहून नवरी त्याच्यासोबत नाचू लागली ; VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! Ranbir Kapoor च्या Channa Mereya गाण्यावर जबरदस्त लिपसिंक

नि:स्वार्थ मनाने हा मुका जीव या बेघर माणसाला आधार देताना पाहून सारेच जण भावूक होत आहेत. अनेक वेळा कुत्र्याने त्याच्या मालकावर येणारं संकट दूर करताना आपल जीव धोक्यात घातलेले अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. विशेष म्हणजे कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी असून बऱ्याच वेळा तो माणसांच्याही मदतीला येत असल्याचं पाहायला मिळतं. या बेघर माणसाच्या आजुबाजुने जाणारे माणसं दिसून येत आहेत, पण कुणालाही या बेघर माणसाचा विचार आलेला नाही. पण या कुत्र्याने मात्र त्याला मिठी मारून निदार आधार तरी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुत्र्यामधील माणूसकी पुन्हा एकदा दिसून आली.

आणखी वाचा : चाकाखाली अडकलेली नोट काढण्यासाठी पठ्ठ्यानं काय शक्कल लढवली पाहा…; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गोंडस व्हिडीओने नेटिझन्सची मने जिंकली आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांनी कमेंट बॉक्स भरून टाकला. “खरं तर, मला असं वाटतं की ही अशी गोष्ट आहे जी दोन कारणांसाठी पाहिली पाहिजे. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेघर लोकांना अजूनही प्रेमाची गरज आहे आणि प्राणी इतके छान असतात की ते माणसांवर बिनशर्त प्रेम करतात,” अशी प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे.