Viral Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
आतापर्यंत ‘एक नंबर तुझी कंबर’वर भारतीयांसह परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात किली पॉल, रिकी पाँडसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये परदेशातील एका तरूणी या गाण्यावर डान्स करताना दिसतेय, जे पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक परदेशी तरूणी परदेशामध्ये रस्त्याच्या कडेला उभी राहून ‘एक नंबर तुझी कंबर’या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय तिने घातलेला गुलाबी रंगाचा ड्रेसही खूप सुंदर दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रावरील @baby.rai_1111 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एकाने लिहिलंय की, “खूप सुंदर” तर दुसऱ्याने लिहिलंय, “खूप क्यूट”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मराठमोळ्या गाण्यावर सुंदर डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर डान्स”