भूक लागली असेल पण घरी काहीतरी बनवायचा कंटाळा, बाहेर हॉटेलमध्ये जायचाही कंटाळा आला किंवा काही बनवण्यासाठी वेळ नसेल किंवा घरात तसं कुणी बनवणारं नसेल तर ऑनलाइन फूड ऑर्डर करणं हा आपल्यासाठी एकमेव मार्ग. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात तब्बल ५० तरूणांच्या टोळीने संपूर्ण मॅकडोनाल्डचं लुटलंय. अनेकदा चोरटे दुकानातील गल्ल्यावर हात साफ करतात किंवा महागड्या वस्तू चोरतात. पण या घटनेत मात्र तरूणांनी मॅकडोनाल्डमध्ये घुसून खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स चोरून नेलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकडोनाल्ड हे नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आपल्या आवडीचे बर्गर, मिल्कशेक्स, फ्रेंच फ्राईज, हे सर्व डोळ्यासमोर येतं. मॅकडोनाल्डमध्ये आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ मिळतात. इथल्या खाद्यपदार्थांची क्रेझ इतकी वाढली की तरूणांनी आता थेट मॅकडोनाल्डमध्ये खाद्यपदार्थांवर डल्ला मारण्यापर्यंत मजल गेलीय. होय. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला विचित्र वाटेल. पण हे खरंय. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

आणखी वाचा : लेकीला पोटाशी घेऊन फूड डिलिव्हरी करतेय ही महिला, VIRAL VIDEO पाहून जनता झाली भावूक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरूणांचा एक समूहच मॅकडोनाल्डमध्ये घुसतो आणि आतमध्ये तिथल्या स्टाफना धमकावून गोंधळ घालतात. सारेच तरूण वेगवेगळ्या दिशेला जाऊन मॅकडोनाल्डमध्ये ठेवलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स चोरताना दिसत आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल ५० तरूणांचा ग्रूप एकाच वेळी मॅकडोनाल्डमध्ये घुसलेले पाहून तिथले स्टाफ सुद्धा घाबरून जातात. हे सारेच तरूण मॅकडोनाल्डमधल सगळेच्या सगळे खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स लुटून घेतात. मॅकडोनाल्ड अगदी रिकामं करून टाकतात. हे सारेच तरूण खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स असे लुटतात जणू बरेच काही दिवस त्यांना जेवण भेटलं नसावं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाणी साचलेल्या खड्ड्याच्या पलीकडे जाण्यासाठी आजीला ट्रक चाकलाने कशी मदत केली पाहा…

ही घटना नॉटिंघम सिटीमध्ये घडलीय. या घटनेबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घटनेत जवळपास २० तरूणांनी मॅकडोनाल्डमध्ये कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचं आढळून आलंय. अद्याप या घटनेबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video gang of 50 youths charges into mcdonalds restaurant in nottingham city steal food and soft drinks prp
First published on: 23-08-2022 at 18:04 IST