Viral Video: सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. परंतु कधीकधी काही कलाकार केवळ प्रसिद्धीसाठी अश्लील नृत्य करताना दिसतात. पण काही कलाकार असेही आहेत जे आपली भारतीय संस्कृती जपत सादरीकरण करतात. आता अशाच एक तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हल्ली सोशल मीडियावर जुनी मराठी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी काष्ठी साडी नेसून डोंगराळ परिसरात ‘आई गं …! माझ्या कमरला लचक भरली ’ या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या अनेक डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील सुंदर हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehapatil1507 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारों व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरनं लिहिलंय, “याला बोलतात अस्सल डान्स.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “एकच नंबर नाचलीस पोरी”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “याला बोलतात मराठमोळा डान्स.”