How Many Gears in Scooty: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ, मजेशीर मीम्स आणि भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. विशेषत: मुली आणि स्कुटी यांचा विषय आला की नेटिझन्स लगेचच खळखळून हसू लागतात, कारण स्कुटी चालवताना मुलींच्या केलेल्या गमतीजमतीवर सोशल मीडियावर नेहमीच भन्नाट मीम्स बनवले जातात. पण, यावेळी जे घडलं ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

एका मुलाने तीन मुलींना अगदी साधा प्रश्न विचारला, “स्कुटीमध्ये किती गिअर असतात?” उत्तर ऐकताच तोच नाही तर लाखो प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. काहींना हसू आवरलं नाही, तर काहींनी कानावर विश्वास ठेवला नाही. तुम्हाला वाटेल, यात विशेष काय? पण थांबा…, मुलींची उत्तरं ऐकलीत तर तुम्हीही हसून लोटपोट व्हाल आणि म्हणाल, “असंही होऊ शकतं का?”

अलीकडेच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. vishalya_edit_54 या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये, एका तरुणाने रस्त्यात तीन मुलींना अगदी साधा प्रश्न विचारला, “स्कुटीला किती गिअर असतात?”
आधी तर त्याने त्यांच्याशी सहज गप्पा मारल्या. नंतर मुलींना विचारलं, “स्कुटी चालवता का की बाईक?” तर तीनही मुली एकाच सुरात म्हणाल्या, “स्कुटी!” त्याने पुढे विचारलं, “तुम्हा सगळ्यांना स्कुटी चालवता येते का?” तर त्यांनी आत्मविश्वासाने “हो” असं उत्तर दिलं.

मात्र, खरी गंमत इथेच सुरू झाली. मुलाने पुढे विचारलं, “बरं, स्कुटीमध्ये किती गिअर असतात?”
आणि काय गंमत झाली माहीत आहे का? एकीने सांगितलं, “२ गिअर”, दुसरी म्हणाली, “३ गिअर”, तर तिसरी तर थेट म्हणाली, “५ गिअर आहेत!” हे ऐकताच मुलगा अक्षरशः गोंधळून गेला आणि या क्लिपवर सोशल मीडियावरील युजर्स अक्षरशः हसून लोटपोट झाले.

या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर २,५०० हून अधिक कमेंट्स करून युजर्सनी आपापल्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “यांना विचारायला हवं होतं, बैलगाडीत किती गिअर असतात?” दुसरा म्हणाला “स्कुटीमध्ये गिअर असतात हे कुठून आलं?” तर आणखी एकाने खिल्ली उडवत लिहिलं, “जर खरंच स्कुटीला गिअर असते, तर मग अपघात होणं नवल नाही” काहींनी तर थेट विचारलं, “अशी गिअरवाली स्कुटी कोणत्या देशात मिळते?” हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत मजा घेतली. काहींनी तर म्हटलं, “स्कुटी आणि गिअरचा मेळ म्हणजे मृत्यूच पक्का!”

व्हिडीओ पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/p/DOBDyWTjBQo/utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=54ca4b49-7ccc-4f58-8aa5-29fa821f8efe

एकंदरीतच, मुलींच्या या उत्तरामुळे लोकांना हसण्याचा अखंड फवारा फुटला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.