VIRAL VIDEO : आधी पोटोबा आणि मग…, भूकेने व्याकूळ ड्रायव्हरने कार्डमधील माहिती लीक होण्याची जोखीम पत्कारली

भूक लागली आणि वेळेत काही खाल्लं नाही की माणसाला काही सुचत नाही, असं म्हटलं जातं. या ड्रायव्हरच्या बाबतीत अगदी असंच घडलंय. भूकेच्या नादात या ड्रायव्हरने असं काही केलं की ते पाहून तुम्हीही आश्चर्य व्हाल.

google-street-view-driver-viral-video
(Photo: Youtube/ googlemapsfun.shorts)

भूक लागली आणि वेळेत काही खाल्लं नाही की माणसाला काही सुचत नाही, असं म्हटलं जातं. अनेकांना भूक अनावर होते. भूक लागल्यावर त्यांना ताबडतोब ती शमवण्यासाठी काहीतरी खायला हवे असते. त्यातल्या त्यात रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्सचे तर जेवणाच्या बाबतीत अंत्यत हाल होत असतात. मग हे ड्रायव्हर रस्त्यावर मिळेल तिथे स्नॅक्स मागवून आपलं पोट भरवीत असतात. अशाच एका ड्रायव्हरला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधल्या ड्रायव्हरला भूक इतकी लागली की त्या भूक शमवण्याच्या नादात त्याने बॅंक कार्डमधील माहिती लीक होण्याची जोखीम सुद्धा पत्कारली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @googlemapsfun नावाच्या टिकटॉक अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका गुगल मॅप ड्रायव्हरचा असल्याचं सांगण्यात येतंय. गुगल मॅप कार चालवत असताना या ड्रायव्हला अचानक भूक लागली होती. हा ड्रायव्हर इतका भूकेने व्याकूळ झाला की आपल्या कारवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये आपलं बॅंक कार्डची माहिती रेकॉर्ड होतेय, याचं भान सुद्धा त्याला राहिलं नाही. भूक लागल्यानंतर या ड्रायव्हरने आपली कार इंग्लंडमधील यॉर्क इथल्या पॉपलटन फास्ट-फूड रेस्टॉरंटजवळ नेली. इथे असलेल्या मॅकडोनाल्ड ड्राईव्ह-थ्रू मधून त्याला हवे असलेले स्नॅक्स मागवले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हा ड्रायव्हर आपली हातात बॅंकेचं कार्ड पकडत कारच्या खिडकीबाहेर हात करून ते मॅकडोनाल्ड ड्राईव्ह-थ्रू च्या कर्मचाऱ्याला देताना दिसून येत आहे. पण याचवेळी कारवर असलेल्या कॅमेऱ्यात या ड्रायव्हरच्या बॅंक कार्डवरील सगळी माहिती रेकॉर्ड झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय.

आणखी वाचा : केसांनी स्वतःला टांगत महिलेने केला खतरनाक स्टंट; VIRAL VIDEO पाहून तुम्ही व्हाल हैराण

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पुन्हा चर्चेत आली ‘पाकिस्तानी गर्ल’; दिलखेचक स्माईलने घायाळ करणारा नवा VIDEO VIRAL

गुगल मॅप कारवर सुरक्षेसाठी एक मोठा कॅमेरा बसवण्यात येत असतो. कार जिथे जिथे जाईल तिथले सर्व फूटेज या कॅमेऱ्यात कैद होत असतात. जेव्हा या गुगग मॅप स्ट्रीटच्या ड्रायव्हरला भूक लागली आणि त्याने आपली गाडी मॅकडोनाल्ड ड्राईव्ह-थ्रू मध्ये स्नॅक्स खाण्यासाठी आणली तेव्हा कदाचिय हा ड्रायव्हर आपल्या कारवरील कॅमेरा बंद करण्यास विसरला. भूकेच्या व्याकुळतेत या ड्रायव्हरला आपल्या कारवरील कॅमेरा चालूच आहे आणि त्यात आपलं बॅंक कार्डची माहिती रेकॉर्ड होईल याचं भान सुद्धा राहिलं नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे हे काय? साडीवर ब्लाऊज घालायला विसरली? त्याऐवजी मेहंदी काढली…हटके फॅशन स्टाईल पाहून लोक हैराण

ज्या व्यक्तीने हे फुटेज पाहिले त्या व्यक्तीने मॅकडोनाल्डच्या ड्राईव्ह-थ्रूवर कार्ड पेमेंट करेपर्यंत काही वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेज टॅप करून या मजेदार क्षणाचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यानंतर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागला. युट्यूबवर या व्हिडीओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २२ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video google street view driver risks card details after visiting mcdonalds drive thru prp

ताज्या बातम्या