केसांनी स्वतःला टांगत महिलेने केला खतरनाक स्टंट; VIRAL VIDEO पाहून तुम्ही व्हाल हैराण

सध्या सोशल मीडियावर एक महिला तिच्या केसांमुळेच चर्चेत आलीय. यामागे कारण सुद्धा तसंच आहे. या महिलेने चक्क तिच्या लांबसडक केसांनी स्वतःला टांगत खतरनाक स्टंट केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

aerial-stunts-hanging-by-hair-viral-video
(Photo: Instagram/ chloejwalsh8)

जगातील प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य हे त्याच्या केसांशी जोडून पाहिलं जातं. विशेषत: स्त्रियांचं सौंदर्य हे त्यांच्या लांबसडक केसांमुळे आणखी खुलून दिसतं. जर आपण याबद्दल बोललो तर प्रत्येकाची इच्छा असते की आपले केस जाड आणि मजबूत असावेत. म्हणूनच लोक त्यांचे केस वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. जेणेकरून त्यांचे केस इतरांपेक्षा सुंदर आणि निरोगी दिसावेत. सध्या सोशल मीडियावर सुद्धा एक महिला तिच्या केसांमुळेच चर्चेत आलीय. यामागे कारण सुद्धा तसंच आहे. या महिलेने चक्क तिच्या लांबसडक केसांनी स्वतःला टांगत खतरनाक स्टंट केलाय, याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

इंग्लंडमधील लिव्हरपूल इथे राहणारी क्लो वॉल्श ही एक कलाकार असून लोकप्रिय हेअर हॅंगर आहे. वॉल्श तिच्या केसांच्या मदतीने असे खतरनाक स्टंट करतेय की ते पाहून अनेक जण तोंडात बोट घालतील. खरं तर, तिने तिच्या केसांच्या मदतीने अनेक अद्भुत कला सादर केल्या आहेत. तिचं हे टॅलेंट पाहिल्यानंतर पाहणारे केवळ पाहतच राहतात. क्लो वॉल्श ही तिचे केस एका हुकमध्ये अडकवून तिचे संपूर्ण शरीर टांगत ठेवून हवेत तरंगण्याचा खतरनाक स्टंट करते. यादरम्यान असे अनेक कलाकुसरी प्रेक्षकांना दाखवले जातात ज्यावर लोक टाळ्या वाजवताना थकत नाहीत.

एका रिपोर्टनुसार, क्लो वॉल्श नावाच्या या महिलेचे केस इतके मजबूत आहेत की ती आपल्या केसांच्या मदतीने स्वतःला लटकवून सर्कसमध्ये अनेक उत्कृष्ट स्टंट करते. क्लो वॉल्श गेल्या ७ वर्षांपासून सर्कसमध्ये काम करत आहे. केसांनी लटकण्याच्या या प्रथेला तिने आपली आवड बनवली आहे. तिने २०१४ पासून सर्कसमध्ये हेअर हॅंगर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे हे काय? साडीवर ब्लाऊज घालायला विसरली? त्याऐवजी मेहंदी काढली…हटके फॅशन स्टाईल पाहून लोक हैराण

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पुन्हा चर्चेत आली ‘पाकिस्तानी गर्ल’; दिलखेचक स्माईलने घायाळ करणारा नवा VIDEO VIRAL

याबाबत बोलताना क्लो वॉल्श म्हणाली की, “लहानपणापासूनच त्यांना डान्सची खूप आवड होती. म्हणूनच जेव्हा सर्कसमध्ये सामील झाली तेव्हा तिला याबद्दल अजिबात माहिती नव्हती. तिला फक्त डान्सच्या जोरावर तिथे आपली ओळख निर्माण करायची होती. तिने विद्यापीठातून डान्सची पदवीही घेतली आहे. पण तिला कधीच सर्कसमध्ये काम करावं लागेल असं वाटलं नव्हतं. मग प्रचंड मेहनत घेत तिने केसांच्या मदतीने टांगण्याचा सराव केला. जेव्हा ती अतिशय उत्तम पद्धतीने हा स्टंट करू लागली तेव्हा तिने प्रेक्षकांसमोर ही खतरनाक स्टंट सादर करण्यात सुरूवात केली.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थंडी वाजते म्हणून मुलीने ओढणी मागितली, तर पाहा आई काय म्हणाली?

या खतरनाक स्टंटचा सराव करतानाचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या chloejwalsh8 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील तिचे हैराण करून सोडणारे स्टंट पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवर हजारो लोक तिला फॉलो करत असतात. तिच्या या खतरनाक स्टंटच्या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये नेटकरी तिच्या टॅलेंटचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman performs aerial stunts hanging by hair in new video killing it says internet prp