Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ हे विनोदी स्वरुपात असतात. असे व्हिडीओ पाहिल्यावर हसता हसता पोट दुखू लागते. तर काही व्हिडीओ पाहून आपण अवाक् होत असतो. या माध्यमावरील काही व्हिडीओ आपल्याला भावनिक करुन जातात. सध्या ट्विटरवर अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आत्महत्या करत असल्याचे दिसते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एक भिकारी त्या तरुणाजवळ जातो आणि त्याला आत्महत्या करण्यापासून कसा रोखतो हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा बस स्टॅंडवर उभा आहे असे दिसते. बसची वाट पाहत तेथे बरेचसे लोक जमा झाल्याचेही आपण पाहू शकतो. व्हिडीओ सुरु झाल्यानंतर काही सेकंदात तो तरुण आपल्या अंगावर काहीतरी ओततो. ते पेट्रोल असावे असा अंदाज आसपासच्या लोकांना येतो. स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकणाऱ्या त्या तरुणाकडे पाहून गर्दीतले लोक बाहेरच्या दिशेला पळू लागतात. काहीजण त्या तरुणापासून लांब जाऊन तो काय करतो हे पाहत असतात. पेट्रोलचे कॅन हातात पकडून उभा असलेला तरुण हातात काडेपेटी/ लायटर घेतो. तेवढ्यात गर्दीतून एक भिकारी पुढे येतो आणि त्या तरुणाच्या हातातील काडेपेटी घेतो. पुढे भिकारी तरुणाला समजवायला सुरुवात करतो. बोलताना तरुणाला मिठी मारतो. भिकाऱ्याचे धाडस पाहून गर्दीतले काहीजण पुढे येतात. त्यानंतर भिकारी पेट्रोलचा कॅन उचलून बाजूला ठेवतो.
@Simonateba यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘त्या तरुणाला मदत करण्यासाठी फक्त भिकारी पुढे आला’ असे कॅप्शन दिले आहे. ३२ सेकंदांच्या या व्हिडीओ ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ५०,००० पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओखाली असंख्य कमेंट्स पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओमधील दिलदार भिकाऱ्याचे कौतुक केले आहे. काहीजणांना हा प्रॅंक व्हिडीओ असून लोकांची मानसिकता जाणून घेण्यासाठी बनवण्यात आला होता. तर काहींना ही व्हिडीओ फेक आहे असे म्हटले आहे.