साप पकडणाऱ्यांचे व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, काही व्हिडीओला बघून अनेकदा थरकाप उडतो, भीती वाटते. बहुतेक वेळा, हे बचावकर्ते अर्थात सर्पमित्र सहजतेने स्तब्ध उभे राहून साप पकडतात. परंतु अनुभवी साप पकडणारे काही वेळा अप्रिय आश्चर्य वाटेल असं काही तरी करतात. अलीकडे, कर्नाटकातील किंग कोब्रा सापाला पकडायचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.फुटेजमध्ये साप पकडणारा बाथरूममधून सापाची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ईटीव्ही भारत नुसार तो कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्थांगडी येथील सर्प तज्ञ अशोक आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

फुटेजमध्ये, सुरुवातीला फक्त १४ फूट किंग कोब्राची शेपटी दिसते, बाथरूमच्या दरवाजातून बाहेर तो डोकावत आहे. साप पकडणारा शेपूट पकडण्यासाठी खाली वाकतो आणि त्याला स्वतःकडे खेचू लागतो. तथापि, साप, एक विषारी किंग कोब्रा, अचानक डोके वर काढतो आणि उडी मारतो, अशोकला मारण्यासाठी सज्ज होतो तेव्हा त्याला भयभीत होऊन परत उडी मारण्यास भाग पाडले जाते. सुदैवाने, अशोक सापाचा हल्ला टाळण्यात यशस्वी झाला आणि वेळीच मागे हटला.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना, भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी “सापाला कसे वाचवू नये. विशेषत: जर तो किंग कोब्रा असेल तर” याचे उदाहरण म्हणून नमूद करत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आज सकाळी ट्विटरवर प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर केल्यापासून हा व्हिडिओ ६०,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.कमेंट विभागात अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी साप बचावकर्त्याला भाग्यवान असल्याचे सांगितले, इतरांनी या परिस्थितीवर विनोद केला आणि सापाच्या विचार प्रक्रियेची कल्पना देखील केली.

ईटीव्ही भारतानुसार, गोपालकृष्ण भट नावाच्या व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये किंग कोब्रा सापडल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. शेवटी सापाची सुटका करून जंगलात सोडण्यात आले.