scorecardresearch

विशालकाय अजगराने वासरावर केला हल्ला, पुढे काय झालं? पाहा हा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने शेतातील बछड्यावर हल्ला केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भलामोठा अजगर एका बछड्याला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

python-viral-video
(Photo: Instagram/ wildlifeanimall)

जगातील सर्वात मोठा सापांचा प्रकार म्हणजे अजगर…त्याची शिकार तो एकदा करायला गेला की जिवंत गिळूनच मोकळा होतो. सध्या सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने शेतातील बछड्यावर हल्ला केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भलामोठा अजगर एका बछड्याला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये १० फूट लांबीचा अजगर आधी गायीच्या गोठ्यात शिरतो, त्यानंतर वासरे घाबरून पळू लागतात. मात्र, अजगराने एका वासराचा पाय पकडल्याने वासरू जीवाच्या आकांताने पळू लागतो. वासरू पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अजगराने त्याचा पाय घट्ट पकडलेला दिसत आहे.

अजगराची पकड इतकी मजबूत असते की वासरू पळत राहिले तरी अजगर काही हार मानायला तयार नाही. वासरू पळत गेले तरी अजगराने वासराचा पाय सोडला नाही. अक्षरशः हा भलामोठा अजगर दूरवर सरपटत गेला पण वासराला या अजगराने काही सोडलं नाही. या व्हिडीओचा शेवट नेमका काय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. बछडा पळून जाण्यात यशस्वी झाला की अजगराचा शिकार झाला हे काही समजलेलं नाही.
wildlifeanimall नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘गायींच्या बाळावर अजगराचा हल्ला… अजगर विरुद्ध वासरू.’ अशी कॅप्शन देण्यात आलीय. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजगराने वासरावर हल्ला केल्यानंतर काय झालं, असे सवाल नेटिझन्स उपस्थित करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : काश्मीरला गेलेल्या मुलीला ही गोष्ट बघायला मिळालीच नाही, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आईची मजुरी मागितली म्हणून तरूणाला पाय चाटायला लावले, बेल्ट-केबलने केली मारहाण, चीड आणणारा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ लोक वारंवार पाहू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. “हा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती कोण आहे?” असा प्रश्न करत नेटिझन्स व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर चिडले आहेत. एवढंच नाही तर सध्या या बछड्याचा मालक कुठे आहे आणि कोणीही त्याच्या मदतीला का येत नाही, असा सवालही नागरिक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video huge python suddenly attack the calf grab the leg and then trending news prp

ताज्या बातम्या