Viral Video: भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतीय परंपरेनुसार विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात ; हे पाहून अनेक परदेशातील लोकांनासुद्धा भारतातील लोकांचे राहणीमान, संस्कृती, कला जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ लेकीच्या परदेशातील प्रियकराचे (बॉयफ्रेंड) भारतीय पद्धतीत अगदी थाटमाटात स्वागत करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रेयसी तिच्या परदेशात राहणाऱ्या प्रियकराला घरी घेऊन येते. यावेळी भारतीय कुटुंब या परदेशी प्रियकराचे आदराने स्वागत करतात. सुरवातीला प्रियकर प्रेयसीच्या आईच्या पाय पडतो. त्यानंतर आई गुलाबाचे पुष्पगुच्छ त्याच्या हातात देते. त्यानंतर आई तरुणाच्या कपाळावर टिक्का लावून, त्याला ओवाळून, गोड पदार्थ भरवून त्याचे स्वागत करते. एकदा बघाच हा व्हिडीओ.

Instagram friend sexually assaults young woman in nagpur
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!

हेही वाचा…मुंबईतील बेस्ट बस चालकाचा बेजवाबदारपणा; सिग्नल तोडला अन्… VIDEO पाहून बसेल धक्का

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्रेयसी भारतातील तर प्रियकर परदेशात राहणार असतो. तर कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी तरुणी प्रियकराला घरी घेऊन येते व यादरम्यान कुटुंबाने केलेलं स्वागत पाहून दोघांचाही आनंद गगनात मावत नाही. कारण – अगदी पारंपरिक पद्धतीने फुलांचा वर्षाव करत या भारतीय कुटुंबाने परदेशात राहणाऱ्या या तरुणाचे हटके स्वागत केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ali_agg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तरुणीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कुटुंबाने केलेलं हे खास स्वागत पाहून भारावून गेले आहेत. तसेच काही जण विविध शब्दात या व्हिडीओचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.