Viral Video: आजकाल रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं जणू ट्रेंड झाला आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच हॉटेल, रेल्वे स्थाकावर तर भररस्त्यात अनेक जण विविध कन्टेन्टवर व्हिडीओ शूट करत असतात. अनेक पोलीस अधिकारी वारंवार आठवण करून देतात तरीही कंटेंट क्रिएटर असे स्टंट करतात.तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन व्यक्ती स्वतःचे वाहन रस्त्यात उभं करून व्हिडीओ शूट करताना दिसले आहेत.

दिल्लीतील पश्चिम विहारजवळील फ्लायओव्हरवरच्या इथे हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. व्यक्ती एक सोनेरी रंगाचा पिकअप ट्रक रस्त्याच्या मधोमध अचानक थांबवते आणि मागून येणाऱ्या वाहनांना थांबवताना दिसते.दोघेजण वाहनातून बाहेर येतात आणि कॅमेऱ्यांसमोर स्टाईलमध्ये पोज देतात. व्हिडीओ जसजसा पुढे जाईल, तसंतसं ते उड्डाणपुलावर गाडीचा दरवाजा उघडा ठेवून वाहन चालवताना दिसले.

Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

हेही वाचा…‘आज जेवणासाठी काय बनवू…’ महिलांच्या आवडी-निवडी सांगणारा हृदयस्पर्शी VIDEO, तुम्हालाही विचार करायला पाडेल भाग

व्हिडीओ नक्की बघा:

https://www.instagram.com/reel/C5DtF36PMFr/?igsh=MWtsbWxmMDFha3lsNA%3D%3D

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वाहतूक विस्कळीत करणे, कायदा मोडणे आणि लोकांसाठी समस्या निर्माण केल्याबद्दल या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अनेक इन्स्टाग्राम , एक्स (ट्विटर) वर वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे आणि दिल्ली पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

हा व्हिडीओ काही तासांपूर्वी @pradeep_dhakajaat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेटवर नेटकरी हा व्हिडीओ रिपोस्ट करून जोरदार टीका करताना दिसत आहेत आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर कारवाई करा अशी मागणी करताना दिसत आहेत.