Viral Video: काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेविषयीचा वाद बराच गाजत आहे. मातृभाषा मराठीचे महत्व पटवून देणाऱ्या आशयाचे अनेक व्हिडीओ, रील्स समाजमाध्यमांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय काही मराठी मालिकांमध्येही मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे मुद्दे सादर केले जात आहेत. याचदरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक परदेशातील चिमुकली अस्खलित मराठी बोलताना दिसतेय.

प्रत्येक व्यक्तीला आपले राज्य, आपली भाषा प्रिय असते. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठीच्या वादावर अनेक मराठी कलाकार, तसेच सामान्य व्यक्तीही पेटून उठल्या आहेत. आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला नाही, तर इतर लोकही त्याचा सन्मान करणार नाहीत, अशा आशयाची मते अनेकांनी व्यक्त केली आहेत. अनेक वर्षे महाराष्ट्रात राहणारे परप्रांतीय मराठीला विरोध करीत आहेत. परंतु, याचदरम्यान एका परदेशातील मुलाला स्पष्ट मराठीतून बोलताना पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इस्रायलमधील एक यहुदी मुलगा अस्खलित मराठी बोलत आहे. यावेळी एक मराठी महिला त्याला मराठीतून त्याचे नाव विचारते. त्यावर तो माझं नाव ग्याबी आहे, असं सांगतो. त्यानंतर ती महिला तू कुठे राहतोस हे विचारते. त्यावर तो मी क्लार्क हाऊसमध्ये राहतो, असे सांगतो. त्यानंतर महिला त्याला तुला मराठी कोणी शिकवलं, असे विचारते. त्यावर तो मीच, असे म्हणून हसतो.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Digital Kesari (@digitalkesari)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @digitalkesari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय, “हा धनंजय मानेच्या मित्राचा मुलगा आहे, जो डायबेटीसचे औषध आणायला इस्रायलला गेला होता”. दुसऱ्याने लिहिलेय, “आमची मराठी भाषा खूप छान”. आणखी एकाने लिहिलेय, “महाराष्ट्रामध्ये ये, तुमचं स्वागत आहे”. आणखी एकाने लिहिलेय, “तो ग्याबी नाही, गंगाराम आहे.”