Viral Video: हिंस्त्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात जंगली कुत्र्यांचा कळप तीन हरणाची शिकार करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

मनुष्यांच्या तुलनेत जंगलातील प्राण्यांचे आयुष्य खूप खडतर असते, कारण त्यांना आपली भूक भागवण्यासाठी युक्ती आणि शक्तीच्या जोरावर आपली शिकार मिळवायची असते; तर काही प्राण्यांना आपण कोणाचीही शिकार होऊ नये म्हणून सावध राहायचे असते. जीवन-मरणाचा त्यांचा हा खेळ सतत सुरूच असतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये तीन हरणं जंगली कुत्र्यांच्या टोळीपासून वाचण्यासाठी एका मोठ्या उंच दगडावर येऊन बसतात. परंतु, कुत्र्यांची टोळी हरणांना पाहते आणि त्यांची शिकार करण्यासाठी त्या दगडावर पोहोचते. यावेळी विविध युक्त्या आखून कुत्र्यांची टोळी हरणांना पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिन्ही हरणं दगडाच्या काठावर बसल्याने जंगली कुत्रे त्यांची शिकार करण्यास असमर्थ ठरतात.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत १३ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “बरं झालं त्या हरणांचा जीव वाचला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मला हे दृष्य पाहून आनंद झाला”; तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मला हरणांचे खूप कौतुक वाटत आहे.”