viral Video: विविध सणांनुसार बाजारात नवनवीन स्टाईलचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. त्यामध्ये पारंपरिक, वेस्टर्न आदी अनेक प्रकार असतात. तुम्ही आतापर्यंत जुन्या साडीचे ड्रेस, गाउन शिवलेलं तुम्ही पाहिले असतील. पण, तुम्ही कधी गोणीपासून कुर्ता आणि पायजमा शिवलेला पहिला आहे का? नाही… तर सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरुणाने गोणीपासून कुर्ता आणि पायजमा तयार केला आहे.

व्हायरल व्हिडीओ एका दुकानातील आहे. व्हिडीओत तरुणाच्या हातात गोणी असते. तरुण सगळ्यात आधी व्हिडीओत गोणी दाखवतो आणि नंतर त्याच गोणीपासून तयार केलेला आकर्षक कुर्ता आणि पायजमा घालून समोर येतो. अन्नधान्य ठेवणाऱ्या गोणीचा असाही वापर केला जाऊ शकतो याचा आजवर कोणी विचार केला नसेल. एकदा पाहाच गोणीपासून तयार केलेला आकर्षक पारंपरिक पोशाख.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Ordered 5 kg paneer online shocking thing came out as soon as it was cut online fraud news
VIDEO: गृहिणीनं ऑनलाईन मागवलं ५ किलो पनीर; कापताच आत निघाली धक्कादायक गोष्ट
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा…VIDEO: उन्हाळ्यात कलिंगडाचे थंडगार सरबत कसे बनवाल? ‘हा’ पाहा आजीबाईंचा उपाय; कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूची गरज नाही

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गोणीपासून बारकाईने तयार केलेला हा कुर्ता सेट अगदीच आकर्षक आहेत. गोणीपासून तयार केलेल्या कुर्त्याला कॉलर, त्याची बटणं तर मॅचिंग पायजम्याने (पँट) तर तरुणाच्या लूकची शोभा वाढवली आहे. दुकानात मिळणाऱ्या जे पाहून तुम्ही थक्कच व्हाल आणि कौतुक कराल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @fashiongalaxy123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणांच्या कौशल्याचे व गोणी पासून बनवलेल्या या खास कुर्ता-पायजमाच्या रचनेचं विविध शब्दात कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.