माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावरून उडी मारली, VIRAL VIDEO पाहून चक्रावून जाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्याने थेट झाडावरून उडी घेत एका माकडाच्या पिल्लाची शिकार केलीय.

माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावरून उडी मारली, VIRAL VIDEO पाहून चक्रावून जाल
(Photo: Twitter/ PannaTigerResrv )

बिबट्या हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. बिबट्या इतका चपळ आणि खतरनाक प्राणी जंगलात शोधून सापडत नाही. अफाट ताकद, चपळाई आणि झाडावरूनही अगदी सहज शिकार करण्याचं कौशल्य त्याला एक उत्तम शिकारी बनवतं. बिबट्याचे हेच गुण दाखवणारा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण अशी शिकार तुम्ही कधीच पाहिली नसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्याने थेट झाडावरून उडी घेत एका माकडाच्या पिल्लाची शिकार केलीय.

बिबट्या त्यांच्या शिकारीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांना ओळखलं जातं. अनेकदा बिबट्या शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. बिबट्याच्या शिकारीचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्या माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून थेट जमिनीवर पडला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर झाला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आणखी वाचा : बाबो! असलं वादळ पाहून अंगावर काटा येईल, कॅनडातल्या चक्रीवादळाचा VIDEO VIRAL

ही अनोखी आणि खतरनाक शिकार पाहून तिथून जाणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ शूट केला जो नंतर व्हायरल झाला. सिंह, वाघ, हायना आणि जंगली कुत्र्यापासून आपण केलेली शिकार लपवण्यासाठी बिबट्या सहसा झाडावरूनच शिकार करत असतात. कारण यापैकी कोणत्याही प्राण्याला झाडावर चढता येत नाही. पण बिबट्याला हे कौशल्य निर्सगतःच मिळालेलं आहे. त्यामुळे शिकारीच्या बाबतीत बिबट्या अव्वल असतो.

आणखी वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात चमत्कार! शंकराच्या पिंडीवर जमा झाला बर्फ, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘सुपरफास्ट’ तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा VIDEO VIRAL

बिबट्याच्या या खतरनाक शिकारीचा व्हिडीओ पन्ना टायगर रीव्हर्स या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय. ‘पन्ना व्याघ्र प्रकल्पातील एक दुर्मिळ दृश्य, माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्या झाडावर उडी मारताना दिसतो.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत साडे सात हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video leopard hunts baby monkey internet shocked prp

Next Story
Sudhir Chaudhary: पत्रकार सुधीर चौधरींनी ‘झी न्यूज’ सोडलं; राजीनाम्यामुळे सोशल मीडियावर चर्चा
फोटो गॅलरी