Leopard Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ, तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. ही शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात. आता व्हायरल व्हिडीओमध्ये देखील असंच काहीतरी घडल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी एका घराच्या अंगणात बिबट्या आला असून यावेळी तो कोणतीही शिकार न करता चक्क जमिनीवर लोळताना दिसतोय. घराबाहेर बिबट्याला पाहून घरातील लोक खिडकीतून व्हिडीओ शूट करत आहेत. बिबट्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @explorer_siddharth या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास अनेक लाइक्स आणि अनेक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “बैलगाडी जुपतो की काय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “त्याला थंडी लागत असेल दादा, घरात घ्या आणि मायेची उब द्या”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लईच लाडाला आलं आहे ”