Viral Video: ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातली सगळी गाणी लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटातलं लल्लाटी भंडार हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं कुठेही ऐकलं की, आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. सध्या या व्हिडीओतील चिमुकली या गाण्यावर नाचताना दिसतोय.
सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ, तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादी हटके ट्रिक व्हायरल होते, तर कधी एखादं गाणं चर्चेत येतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली ‘लल्लाटी भंडार’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, एक चिमुकली ‘लल्लाटी भंडार’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओतील तिचा सुंदर डान्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. तिच्या या डान्सला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manu_patange या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “आईशप्पथ काय नाचली राव ही”, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच भारी”, तर आणखी एकाने लिहिलेय, “एक्स्प्रेशन्सही कमाल आहेत”, तर आणखी एकाने लिहिलेय, “मस्त डान्स”.