Viral Video: कुत्रा अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. कुत्र्याला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. त्याशिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण कुत्र्याचा वाढदिवसदेखील आवडीने साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; त्याशिवाय या लाडक्या प्राण्याचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

नजर काढणे काहींसाठी श्रद्धेचा विषय आहे तर अनेकांसाठी अंधश्रद्धेचा. परंतु, अनेक घरांमध्ये आपल्या लेकरांना नजर लागू नये म्हणून त्यांची नजर काढली जाते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक आई घरातील लहान श्वानाची नजर काढताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये एक महिला श्वानाच्या लहान पिल्लाची मिठाने नजर काढताना दिसत आहे. स्वतःच्या मुलांइतकीच श्वानाची काळजी घेणाऱ्या आईला पाहून नेटकरीही तिचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dj_ajay_edits या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “आई अशीच असते”, तर दुसऱ्याने लिहिलेय, “आईच्या मायेला तोड नाही”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप भावनिक”