एका तुटलेल्या पुलावरून पठ्ठ्यानं केली रॉयल एनफिल्डची स्वारी, VIRAL VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

बुलेट म्हटलं कि एक रॉयल बाईक जी सर्वाना खूप आवडते बुलेटचा एक वेगळाच स्वॅग आहे.

एका तुटलेल्या पुलावरून पठ्ठ्यानं केली रॉयल एनफिल्डची स्वारी, VIRAL VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
(Photo; Instagram/ harishraj1942)

Royal Enfield बुलेटची अनेक वर्षांपासून वेगळीच क्रेझ राहिलीये. कंपनीची देखील ही सर्वात लोकप्रिय व बेस्ट सेलिंग बाईक आहे. बुलेट म्हटलं कि एक रॉयल बाईक जी सर्वाना खूप आवडते बुलेटचा एक वेगळाच स्वॅग आहे. तरुणाई तर बुलेटवर विशेष फिदा आहे. या बुलेटवर बसून वेगवेगळे साहस करण्याची हौस अनेकांना असते. असंच एक भयंकर धाडस व्यक्तीने केलंय. चक्क तुटलेल्या पुलावरून रॉयल एनफिल्ड चालवत नेली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूल पूर्णपणे खचलेल्या अवस्थेत झाला आहे. हा पूल कोसळण्याच्या स्थितीत असून फक्त थोडीशी, कमजोर बाजूची रेलिंग शिल्लक आहे. या पुलावरून बाईकवरून एका बाजूने दुसर्‍या बाजूने जाणे अशक्य आहे. पण हे अशक्य काम शक्य करून दाखवलंय. होय. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. या व्हायरल व्हिडीओमधला व्यक्ती तुटलेल्या पुलाच्या किनाऱ्यावरून रॉयल एनफिल्ड अगदी सहज चालवत आणतो. या छोट्याश्या किनाऱ्यावरून रॉयल एनफिल्ड नेताना थोडी जरी इकडे तिकडे झाली असती तर कदाचित हा व्यक्ती त्याच्या बुलेटसोबतच पाण्यात पडला असता. पण या व्यक्तीने इतक्या सफाईदारपणे ही बुलेट तुटलेल्या पुलाच्या किनाऱ्यावरून चालवत आणली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं

हा व्हिडीओ harishraj1942 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. रॉयल एनफिल्डचे कोणतेही व्हिडीओ असू द्यात, ते लोकांना फार आवडतात. कारण या बुलेटबाबत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या चिमुकल्या मुलीने इतकं भन्नाट लोकनृत्य सादर केलंय की तुम्ही पाहतच राहाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रॅफिक सिग्नलवर लेझर तलवारी विकणाऱ्या या व्यक्तीचं टॅलेंट पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी असे साहस न करण्याचं आवाहन केलंय. तर काहींनी या व्यक्तीच्या राईडचं कौतूक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रिक्षावाल्याचा नादखुळा! ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर काय केलं पाहा; Video झाला Viral
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी