हॉटेलच्या जेवणात अळी किंवा इतर किटक सापडल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर अधून मधून व्हायरल होत असतात. डॉक्टर नेहमी बाहेरचं खाण्यास मनाई करतात, तरीही लोक सर्रास हॉटेलमधलं खाणं खातात. यावेळी त्या हॉटेलमधील साफसफाई, स्वच्छता आपण अजिबात पाहत नाही. बरेचवेळा हॉटेलमधील अस्वच्छतेचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. हॉटेलमधील काही किळसवाणे प्रकारही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच यापुढे हॉटेलमध्ये जाताना १०० वेळा विचार कराल.

थुंकी लावून बनवायचा तंदूर रोटी –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हॉटेलच्या मागील बाजूस रोटी तयार करताना दिसत आहे. मात्र या रोटी बनवताना हा व्यक्ती अत्यंत किळसवाण कृत्य करत आहे. हा व्यक्ती रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. रोटी तयार केल्यानंतर हा व्यक्ती प्रत्येक रोटीवर थुंकत आहे. त्यानंतर रोटी शेकायला टाकत आहे. दरम्यान कोणीतरी लपून हा व्हिडीओ शूट केला आहे. बागपत जिल्ह्यातील खेकरा भागातील रतौल येथील एका रेस्टॉरंटमध्ये थुंकून रोटी बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: ब्रेक फेल झाला, प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, मात्र चालकानं जे केलं ते पाहून प्रवासीही म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. तर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आरोपी शाहनवाजला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.