Viral Video: व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असली तरीही त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग हा चांगल्या वा वाईट कर्मांवर अवलंबून असतो. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते आणि आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असे म्हणतात की, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करीत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात चोरी करणाऱ्या एका चोरासमोर चक्क नाग आल्याचे दिसत आहे.

एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. सोशल मीडियामुळे सापांचे अनेक भयानक व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कधीही चोरी करू नये, नाही तर त्याचे वाईट फळ आपल्याला लगेच मिळते, असे आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आणि शाळेत शिकवण्यात आले आहे. पण, काही चोरी करणारे लोक असे असतात, ज्यांना कशाचा काहीच फरक पडत नाही. या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो आणि त्याच्या पायाला विळखा मारून बसतो. नागाला पाहून त्या व्यक्तीच्या तोंडचे पाणी पळते. झाडावरून खाली कसे उतरावे या विचाराने आणि नागाच्या भीतीने तो रडवेला होतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kokansth_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कर्माचे फळ आहे”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच भयानक सीन”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “कशाला जायचं चोरी करायला”.