सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील प्राण्यांचेही बरेच व्हिडीओ असतात. रानटी प्राण्यांना आपल्या मनोरंजनासाठी काही लोक मुद्दाम त्रास देतात. यामध्ये त्या प्राण्यांना त्रास होतोच, पण त्यांचा राग अनावर झाला तर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच खुप मोठे नुकसान होते, त्यांना ते प्राणी जखमी करतात. असे काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस भल्यामोठ्या मगरीची शेपूट खेचत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क मगरीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. एक भलीमोठी मगर पाणवठ्याजवळ जमिनीवर आलेली दिसत आहे. तिच्याजवळ जात एक माणूस तीची शेपूट खेचू लागतो. आता पुढे काय होणार असा प्रश्न आपल्याला पडतो. पण ती मगर यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. कदाचित अश्या स्टंट प्रकारासाठी त्या मगरीला सवय झाली असेल, याचाच अर्थ अशप्रकारे मगरीला सतत त्रास दिला जात असेल, अशी शक्यता या व्हिडीओवर व्यक्त करण्यात येत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने रचला सापळा; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशाप्रकारे प्राण्यांची मस्करी करणे, त्यांना त्रास देणे महागात पडू शकते अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.