Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी नाचताना दिसतायत.
सोशल मीडियामुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये पती-पत्नी ‘तेरे आने से’ या गाण्यावर खूप सुंदर डान्स करत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vikramjadhav4687 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलंय की, “नवरा खूप खूश आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती तो निरागसपणा वाटतोय तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर.”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “तुमची जोडी खुप छान आहे”