एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये विद्यार्थी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तूफान हाणामारी झाल्याचं दिसतंय. यामुळे टोल परिसरातून जात असलेल्या इतर प्रवाश्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील टोल प्लाझा परिसरातला आहे. तामिळनाडूमधील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समूह इथून जात असताना त्यांना पेमेंटच्या मुद्द्यावरून अडवलं होतं. त्यानंतर सुरू झालेली बाचाबाची पुढे जाऊन हाणामारीत रूपांतरीत झाली. इतकंच काय तर या हाणामारीत दगडफेकही करण्यात आली. विद्यार्थ्यांचा राग इतका अनावर झाला की अक्षरशः त्यांनी हेल्मेटच टोल बूथ कर्मचाऱ्यांवर फेकण्यास सुरूवात केली. यात तिथून जात असलेल्या इतर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आणखी वाचा : यापैकी एक अंड थोडं वेगळं आहे! यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : फणा काढून उभा असलेल्या किंग कोब्राच्या माथ्यावर केलं कीस; VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विद्यार्थी परीक्षेनंतर परतत असताना लॉच्या एका विद्यार्थ्याला वाहन टोल प्लाझावर थांबवण्यात आले. कारण त्याचे फास्टॅग पेमेंट काम करत नव्हते. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याची कार मागे घेण्यास सांगितले आणि त्याच्या मागे रांगेत असलेल्या इतर वाहनांचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांचा पारा चढला आणि हेल्मेटचा वापर करत कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने गोंधळ झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना टोल प्लाझाच्या आत आणि बाहेर वाहनांच्या प्रवाहात अडथळा आणू नये असा इशारा दिला. पण विद्यार्थ्यांनी धीर धरला. त्यानंतर तामिळनाडूची नोंदणी असलेल्या गाड्यांना रस्ता दिला आणि आंध्र प्रदेशातील गाड्यांचा मार्ग रोखला.
लहान मुले आणि परिसरातील नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून तपास सुरू केला आहे.