Mother Hit Baby Child With Her Chappal : आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी आईचा जीव अगदी कासावीस होतो. लेकरांच्या निरागसतेपुढे आईचा राग मात्र हारवून जातो. लेकरांच्या सुरक्षेसाठी आई मोठ्या अडचणींशीही लढते, पण काही स्त्रिया अशा आहेत ज्या आपल्या लेकांरासाठी राक्षसी ठरतात. मात न तू वैरणी म्हणवणारी संतापजनक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय. या निर्दयी आईने आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून आपटून चपलीने बेदम मारहाण केलीय. मुलगी कळवळत राहिली पण तिच्या निर्दयी आईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल.

हे वाचून सुरूवातीला तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. इतकी निर्दयी आई असू शकते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण हे प्रत्यक्षात घडलंय. खरं या महिलेचं तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. याचा राग तिने आपल्या अवघ्या वर्षाच्या लेकीवर उतरवला. ही महिला इतकी रागावली होती की आपल्या लेकीला इतकी बेदम मारहाण केल्यानंतर तिला जीव किती कळवळेल, याचा विचार सुद्धा तिच्या मनात आला नाही. या महिलेने निर्दयीपणे निष्पाप मुलीला आधी उचलून शेतात फेकलं. ही मुलगी तिथे जागेवर बसून ओक्साबोक्शी रडू लागली. यावर महिलेचं समाधान झालं नाही, मग ती आपल्या लेकीला चप्पलने मारहाण करू लागली. महिलेच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
dombivli crime news, double money scheme dombivli marathi news,
डोंबिवलीत दामदुप्पटच्या आमिषाने ज्येष्ठांची फसवणूक

आणखी वाचा : नंदीवर स्वार होऊन रस्त्यावर अवतरले ‘महादेव’! अनोख्या भक्ताचा VIRAL VIDEO पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

हे प्रकरण हापूर कोतवाली परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी दुपारी एक महिला तिच्या घरी हजर असताना तिचा पतीसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. यादरम्यान पतीने तिला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या महिलेने आपल्या एका वर्षाच्या चिमुरडीला बेदम मारहाण केली. या व्हिडीओमध्ये ती काही सेकंदांत चप्पलने मुलीला लागोपाठ पाच वेळा मारहाण करताना दिसतेय. बॉबी असं या महिलेचे नाव असून ती जसरूपनगर येथील रहिवासी आहे. व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. तसंच तिच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवला आहे. कोतवालीचे प्रभारी निरीक्षक सोंबीर सिंह यांनी सांगितले की, आरोपी महिलेने सांगितले की तिचा नवरा इलेक्ट्रिक मेकॅनिक आहे, तिच्याशी भांडण झाल्यानंतर महिलेने तिचा राग मुलीवर काढला होता.