Viral Video: आईला जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणतात, कारण आपल्या मुलांवरती कोणतंही संकट आलं तरीही त्यांच्या रक्षणासाठी ती आपला जीव पणाला लावते. आई ही आई असते, मग ती प्राण्यांची असो वा माणसाची. कारण प्राणीदेखील आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात आणि शेवटपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलांचा जीव वाचवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हत्तीणीने आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या हत्तीणीने आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी काय केलं ते पाहाल तर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलातील नदीच्या किनाऱ्यावर हत्तीण तिच्या पिल्लासह पाणी पित असून यावेळी अचानक पाण्यातून मगर बाहेर येते आणि हत्तीणीच्या पिल्लाची सोंड पकडते. यावेळी हत्तीण चवताळून मगरीवर हल्ला करते. हत्तीण मगरीला आपल्या सोंडेत पकडून तिला जमिनीवर आपटते. त्यानंतर पायाने मगरीला पायदळी तुडवते. खरंतर, या व्हिडीओतील काही भाग खरा असून पुढील काही भाग AI च्या मदतीने दाखवण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @motivational_svsrr या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत अनेक व्ह्युज मिळाल्या असून हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “आई अशीच असते”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “AI व्हिडीओ आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ.”