Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलं तर कधी वयोवृद्ध माणसं डान्स करताना दिसतात. तुम्ही आजवर अनेक डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या माय लेकाचा असा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या आईबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे. माय-लेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही कौतुक केल्या शिवाय राहणार नाहीत.

ज्याप्रमाणे बाप आणि लेकीचे नाते खूप खास मानले जाते. त्याचप्रमाणे आई आणि मुलगा यांच्यातील बॉण्डिंगही खूप खास असते. आई तिच्या मुलांना फक्त संस्कारच नाही, तर अनेक नवनवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहनही देते. आजपर्यंत आई आणि मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या आईबरोबर ‘आप के आ जाने से’ या जुन्या बॉलीवूड गाण्यावर गोविंदा स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतोय. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स तुम्हीही टक लावून पाहत राहाल. माय-लेकाच्या जोडीचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhagyashrikendreofficial या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाइक्स आल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई पण छान डान्स करतात”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “चिमुकल्यांचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आई हुशार आहे म्हणूनच मुलगा हुशार आहे ”. आणखी एकाने लिहिलेय, “माय लेकाचं कितीही कौतुक केले तरीही कमीच आहे”.