Viral Video: वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे हे अनेकतरुणांना फार कौतुकाचं वाटतं. अशात मागे एखादी मुलगी बसली असेल तर तरुणांच्या उत्साहाला काही पारावारच उरत नाही. वाऱ्याशी स्पर्धा करणारा एखादा बाईकस्वार जेव्हा सुसाट वेगाने शेजारून कट मारून जातो तेव्हा अक्षरशः काळजात धडकी भरते. बहुतांश वेळा हीच मंडळी पुढे जाऊन कधी खांबाला तर कधी झाडाला आदळतात आणि ओढवून घेतलेल्या अपघाताचे शिकार होतात. तुफान वेगात गाडी चालवण्याची भलतीच क्रेझ आता आणखी एका नव्या उदाहरणासह सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये खरंतर बाईक चालवणारा तरुण तर अगदी सुरक्षित आहे पण मागे बसलेल्या तरुणीबाबत जे घडतं ते पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की. पांढरा टी शर्ट घातलेला एक मुलगा अतिशय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. त्याच्या मागे एक मुलगी बसलेली दिसते. बाईकचा वेग अधिक असल्याने स्पीड ब्रेकरवर ही तरुणी काही फूट उंच हवेत उडते. यात पहिल्या वेळेस ही तरुणी थोडक्यात बचावते पण त्यावर न थांबता आणखी एकदा स्पीड ब्रेकरवर हा तरुण आणखी वेगाने गाडी चढवताना दिसत आहे.
या १५ सेकंदाच्या व्हिडिओला २२ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत तर १ लाख जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. आपण व्हिडीओ खाली नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहू शकता, अनेकजण ही मुलगी नेमकी जशी वर गेली तसेच खाली कशी आली यामागचं विज्ञान समजावून सांगत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Video: अपघातग्रस्त वेदनेने कळवळताना रिक्षावाले थांबेना इतक्यात JCB आला अन…पाहा थक्क करणारा क्षण
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातील आहे हे कळू शकले नाही. अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या तरुणांवर कारवाई होणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण ही मंडळी स्वतःचा नाही तर इत्रणाचाही जीव धोक्यात घालत असतात अशा प्रतिक्रियासुद्धा नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर नोंदवल्या आहेत.