कॅनडामध्ये असणाऱ्या भारतीयांच्या संख्या पाहून धक्का बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर एका चीनी महिलेने शेअर केला आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी थिअरी टेस्ट देण्यासाठी महिला जिथे गेली होती तिथे हा व्हिडीओ शुट केल्याचा दावा या महिलेने केला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही असे वाटेल की ती भारतात आहे असेही महिलेने सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये महिलने ड्रायव्हरच्या परीक्षेची वाट पाहत असलेल्या लोकांना दाखवले आहे ज्यामध्ये बहुतांश भारतीय लोक असल्याचे दिसत होते.

“हे भयंकर आहे. कॅनडात भारतीयांनी घेरले आहे”असे मत व्हिडीओमध्ये महिलेने व्यक्त केले आहे. महिलेचा व्हिडिओ प्रामुख्याने भारतातील शीख समुदयातील लोक दिसत होते. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेच्या या मतावर प्रश्न उपस्थित केला आगहे.

व्हायरल व्हिडीओमधील महिलेला हे इतकं भयंकर का वाटत आहे असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महिलेच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी रोष व्यक्त केला. एकाने म्हटले,”कॅनडामधील भारतीय स्थलांतरितांबद्दल चिनी महिला रोष व्यक्त करत आहे हे विचित्र आहे.”

हेही वाचा – जीवाशी खेळ! तरुणाचं भररस्त्यात भलतचं धाडस, धोकादायक स्टंटचा Viral Video पाहून पोलिसांनी…

येथे पाहा Viral Video

दुसऱ्याने सांगितले “मीकाही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये होताो आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की, इतर गौरवर्णीय कॅनेडियन अजूनही खूप छान लोक आहेत, परंतु कदाचित ते त्यांच्या स्वत: च्या फायद्यासाठी खूप चांगले वागतात.”

अनेकांनी ती कॅनडात स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आणून दिले. “मी काही वर्षांपूर्वी व्हँकुव्हरला गेलो होतो, आणि थेट ४० टक्के लोकसंख्या चिनी स्थलांतरित आहे, त्यामुळे कदाचित तिनेही घरी जायला पाहिजे” असे एकाने लिहिले. “हो, मग ती पण चुकीच्या देशात आहे,”असे दुसरा म्हणाला.

हेही वाचा – पुणेरी आजोबांचा नादखुळा! स्टेजवर चढून हवेत काठी घेऊन बिनधास्तपणे नाचले आजोबा! Viral Video एकदा बघाच

“ही महिला स्वत: चीनची आहे. मला खात्री आहे की, भारतीय तिच्याकडे पाहून तेच बोलत आहेत,” एकाने लिहिले.

” जगभरातून येणाऱ्या स्थलांतरितांमुळे कॅनडाची ओळख शतकानुशतके विकसित होत आहे. मग ते युरोपियन असो, आशियाई असो किंवा इतर, या विविधतेमुळे आजचा कॅनडा तयार झाला आहे,” असे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोस्टला उत्तर देताना एकाने म्हटले, “हे खूप उलटंच घडतं आहे कारण इथे जास्त चिनी आहेत.”