Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडीओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून मन भावुक होते. काही लोक त्यांची कला सादर करतात तर काही लोक हटके जुगाड किंवा ट्रिक सांगतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका गावाने अनोखा जुगाड शोधला आहे जो सोशल मीडियावर नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. नेमका हा जुगाड काय आहे, जाणून घेऊ या.
फ्रेश हवा घेण्यासाठी झाडांना बांधले पंखे…
सध्या उन्हाळा सुरू आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लोक पंखा, कुलर आणि एसी सुरू करतात ज्यामुळे त्यांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळतो. शहरापासून गावापर्यंत सर्व जण आता वस्तूंचा वापर करतात पण तरीसुद्धा गावात झाडाच्या थंड सावलीत बसून निसर्गाची ताजी हवा घेणे, हे गावकऱ्यांच्या दिनचर्येचा एक भाग आहे. पण तुम्ही कधी असे पाहिले का झाडांना पंखे बांधले आणि लोक झाडाच्या खाली बसून हवा घेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हा अनोखा जुगाड दिसून येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मोठे वृक्ष दिसेल. या वृक्षाच्या फांद्यांना इलेक्ट्रिक पंखे बांधलेले आहे आणि या वृक्षाच्या खाली बसलेले लोक या पंख्याची हवा घेत आनंद लुटताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
villagedeshilife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावातील लोक काही कमी नाही”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला वाटते हे पंखे विजेशिवाय चालत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वाह मस्त, असं करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “गावातील लोक खूप टॅलेंटेड असतात” एक युजर लिहितो, “याला म्हणतात टेक्नोलॉजी” तर एक युजर लिहितो, “हा व्हिडीओ बिहारचा आहे, येथे काहीही होऊ शकते” अनेक युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.