एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तीन चित्त्यासोबत व्यक्ती झोपल्याचा व्हिडीओ काही दिवसांपुर्वी प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीने चित्त्यांना मिठी देखील मारली होती. हा व्हिडीओ पाहून सारेच जण अवाक झाले होते. या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं आहे.

तीन चित्त्यांसोबत झोपलेल्या या व्यक्तीचं नाव डॉल्फ व्होल्कर असं आहे दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफॉन्टेन येथील चित्ता प्रजनन केंद्रात हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागले. चित्ताचं साधं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये तर या व्यक्तीने चक्क चित्त्यांना मिठी मारत झोपलेला पाहून प्रत्येकजण निरखून हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले. तसा हा व्हिडीओ जुना असला तरी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण या व्हिडीओमागचं सत्या समोर आलंय.

२०१९ मध्ये शेअर केलेला व्हिडीओ चित्ता प्रजनन केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करत असलेल्या व्होल्कर यांचा अनुभव दर्शवितो. या व्हिडीओमध्ये जुनो आणि गॅब्रिएल नावाचे दोन चित्ते दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असं लिहिले आहे की, चित्ता थंड कॉंक्रीट किंवा उबदार ब्लँकेट पसंत करतात? हे बंदिस्त चित्ते दक्षिण आफ्रिकेतील चित्ता प्रजनन केंद्रात जन्मले आणि वाढले. हे सर्व चित्ते एकसारखे आहेत. कारण ते एका प्रजनन कार्यक्रमासाठी तयार केले जातात, जेणेकरून जेव्हा त्यांना शावक होतील तेव्हा त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाऊ शकते. या चित्त्यांची आई यासाठी परवानगी देत असते.

आणखी वाचा : रिकाम्या विमानात एअर होस्टेसचा ‘बलम पिचकारी’ गाण्यावर धांसू डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हातावर पोट असलेल्या आजोबांची हातगाडी अधिकाऱ्यांनी उलटवली, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

या व्यक्तीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “नजीकच्या भविष्यात यापैकी एका चित्ताला संरक्षित वन्यजीवांमध्ये सोडण्याची योजना आहे. मला या तिघींसोबत रात्रभर झोपण्यासाठीची विशेष परवानगी देण्यात आली. कारण मी त्यांना मोठे होताना पाहिले आणि मागील स्वयंसेवा दरम्यान त्यांच्याशी नाते निर्माण केले. हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी २०२१ मध्ये, सोशल मीडियावर एक अफवा पसरली की हा व्हिडीओ भारतातील राजस्थानमध्ये शूट करण्यात आला आहे. रॉयटर्सच्या फॅक्ट-चेक रिपोर्टनुसार व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेत शूट केला गेला होता आणि चित्यांची काळजी व पालनपोषण व्होल्करने केले होते. त्यामुळे प्रत्येक वेळी तो पुन्हा घटनास्थळी गेल्यावर चित्ते त्याला ओळखतात आणि मिठी मारतात.