आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅन हे कार्टून आणि सिनेमात पाहिलं असेल. पण जर खरंच तुमच्या समोर एखादा स्पायडर मॅन आला तर? होय, हे खरंय. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. जगात अनेक लोक अशा धोकादायक गोष्टी करतात, ज्याचा विचार करून ते घाबरू लागतात. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवतात. बर्‍याचदा अग्निशमन दलाचे जवान लोकांचे प्राण वाचवण्यासाठी इमारतीत आगीच्या ज्वाळांमध्ये घुसताना तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर अशाच एका फायर फायटरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती स्पायडर मॅनच्या वेगाने इमारतीवर चढताना दिसून आला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे डोळे विस्फारून जातील. या व्हिडीओमध्ये जॉर्ज नावाचा माणूस दिसत आहे. ही व्यक्ती बल्गेरियाची रहिवासी असून तो अग्निशामक दलात कार्यरत आहे. व्हिडीओतील या व्यक्तीचा वेग पाहून तुम्ही त्याचे फॅन व्हाल. ती व्यक्ती हातात शिडी घेऊन तीन मजली इमारतीच्या दिशेने धावताना दिसून येत आहे. इंटरनेटवर लोकांनी या माणसाला ‘स्पायडर मॅन’ ही पदवी दिली आहे.

आणखी वाचा : बाप-लेकीच्या जोडीचा भन्नाट डान्स, तुम्हीही पहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : असा अनोखा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावरील लोकांनी जॉर्जची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, खरं तर या व्यक्तीने ‘स्पायडर मॅन’ चे पात्र साकारले पाहिजे. याआधीही न्यूयॉर्कमधून फायर फायटरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एखाद्या चित्रपटातील स्टंटप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करत होता.