ग्रामीण भाग तसेच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याचं किंवा त्यांचा बळी गेल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांचे अपघातदेखील होत आहेत. तसेच सोसायटीतही आता कुत्रा पाळणावरुन बरेच वाद होतात. पाळीव कुत्रा असला तरी, कधी हल्ला करतीला याचा नेम नसतो. यामुळे काहीजण याला विरोधा करतात. एका भटक्या कुत्र्याला निर्दयीपणे मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाचं भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण मीरा रोड येथे समोर आले आहे.

वृद्ध महिलेला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील लक्ष्मी पार्क परिसरातील वासुदेव प्लॅनेट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. पोलिसांना दिलेल्या जबाबात, ज्येष्ठ नागरिक शर्लिन स्मिथने सांगितले की, तिला चौकीदाराचा फोन आला ज्याने तिला खाली येण्यास सांगितले. कंपाऊंडमध्ये पोहोचल्यावर, तिला शिवीगाळ करण्यात आली. काही सदस्यांनी इमारतीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. हा वाद इतका विकोपाला गेला की, यात वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. दरम्यान या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धेची सोनसाखळीही हिसकावून घेण्यात आली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मेंढीने स्वत:ला पहिल्यांदाच आरशात पाहिले अन् Video पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दोन वर्षांपासून पुरुष आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. दरम्यान, मीरा रोड पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.