गेल्या काही दिवसांपासून मुक्या जीवांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहे. प्राण्यांचा छळ केल्याचे व्हिडीओ समोर येत आहे. काही लोकांना मुक्या जीवांना त्रास देण्यात खूप मजा वाटतो. कधी शेपटी खेच, कधी कान खेच, त्यांना दोरी किंवा पट्ट्याने बांधून ओढत नेणं, चपलेने मारणं असे एक ना दोन प्राण्यांच्या छळाचे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

तरुणाला बकरीनं दिली भयानक शिक्षा

रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या जनावरांमुळे अनेकदा काही समस्यांना सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे काही समाजकंटक शांत प्राण्यांना त्रास देताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकवेळा मोकाट जनावरेही उलट हल्ला करताना दिसतात.असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पांढरा शर्ट आणि लुंगी घातलेला एक माणूस बळजबरीने बकरीला त्रास देताना दिसत आहे. हा व्यक्ती बकरीच्या शिंगाला पकडून तिला गोल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान तो गटरात पडतोही मात्र तरीही तो बकरीचे शिंग सोडत नाही. नंतर तो बकरीला सोडतो आणि निघून जातो. त्याच वेळी रागवलेली बकरी त्या व्यक्तीच्या मागे जाते आणि मागून त्याला जोरदार टक्कर देते. यावेळी तो माणूस जोरात खाली पडतो आणि त्याची लुंगीही सुटते.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – अशी वेळ कोणत्याच आई वडिलांवर येऊ नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला…हॉस्पिटमधील Video viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @qadrim.qasim या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सुरुवातीला व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी जितका संताप व्यक्त केला तितकाच आनंद त्यांना व्हिडीओचा शेवट पाहून झाला आहे. कारण छळ करणाऱ्या या हैवानाला बकरीने चांगलीच अद्दल घडवली आहे. जर बकरीच्या जागी आपण असतो तर आपणही त्याच्यासोबत तेच केलं असतं, अशी प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे.