कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्याने हे वक्तव्य शाहरुख खानच्या बाबतीत केलं आहे. शाहरुखने आपल्याला एक प्रॉमिस केलं आहे असं रिंकूने सांगितलं आहे. एका ओव्हरमध्ये जेव्हा मी पाच सिक्स मारल्या होत्या तेव्हा मला शाहरुख सरांचा फोन आला होता त्यावेळी जे बोलणं झालं ते आता रिंकूने सांगितलं आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात रिंकूने ही जबरदस्त खेळी केली होती.
काय म्हटलं आहे रिंकू सिंगने?
मी जेव्हा एका ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्या तेव्हा ती खेळी सगळ्यांनाच आवडली. माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. त्यावेळी मला शाहरुख खान सरांचाही फोन आला. ते मला म्हणाले रिंकू तू लग्न कधी करणार आहेस ते सांग. लोक मला त्यांच्या लग्नात बोलवतात पण मी जात नाही. मात्र मी तुझ्या लग्नात नाचायला नक्की येणार असं प्रॉमिस मला शाहरुख सरांनी केलं असं रिंकू सिंगने म्हटलं आहे. जियो सिनेमाच्या कॉमेंटेटर्ससोबत बोलत असताना रिंकूने शाहरुख सरांनी काय प्रॉमिस केलंत ते सांगितलं आहे. रिंकू सिंगचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
रिंकू सिंगने IPL 2023 मध्ये झळकावली दोन अर्धशतकं
रिंकू सिंगने IPL 2023 मध्ये आठ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये २५१ धावा त्याने केल्या आहेत. आठपैकी चारवेळा रिंकू नाबाद राहिला आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आरसीबीच्या विरोधात खेळताना रिंकू सिंगने १० चेंडूत १८ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात रिंकू सिंगच्या बॅटने मैदानात अक्षरक्षा धावांचा पाऊसच पडला होता. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत रिंकू सिंगने पाच लगातर षटकार ठोकून सामना खिशात घातला. संपूर्ण क्रिकेटविश्वात रिंकू सिंगच्या वादळी खेळीची चर्चा झाली. कारण, रिंकूने पाच षटकारांच्या जोरावर नवीन पाच विक्रमांना गवसणी घातली. या खेळीनंतर शाहरुख खानसह जगभरातील लोक त्याचे अभिनंदन केलं. आज त्याने शाहरुख खानने नेमकं काय म्हटलं होतं ते देखील सांगितलं आहे.