Viral Video: लहान मुलांचा मूड सांभाळणं हे मोठ्या जिगरीचं काम आहे. कधी कुठली मागणी तुमच्यावर फेकून मारली जाईल, आणि मग ती पूर्ण झाली नाही तर मग जे होईल याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. मारून मुटकून या मुलांना ओरडणं हा पर्यायही नसल्याने बालहट्टासमोर भलेभले झुकतातच. अशातच एखाद्या लहानग्याला त्याला ना आवडणारी गोष्ट करायला लावणे म्हणजे किती मेहनत लागत असेल याचा अंदाज तुम्हीच लावा. अशीच काहीशी अवस्था या व्हायरल व्हिडिओमधील लहानग्याच्या आईची झाली असणार. अभ्यासाला कंटाळलेल्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा मुलगा अभ्यासाला एवढा वैतागलाय की ते बघून नेटकरी आपल्या समस्या विसरले आहेत.

@Gulzar_sahab या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकता की चिमुकला आपल्या आईकडे रडून तक्रार करत आहे. हिंदीचा गृहपाठ बघून रडू लागलेला हा चिमुकला म्हणतो “आयुष्यभर काय अभ्यासच करत बसू का, मी म्हातारा होईन” यावर त्याच्या आईने दिलेलं उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलाने अभ्यासाची तक्रार करताच त्याची आई म्हणते,”मग हो ना म्हातारा, सुशिक्षित म्हातारा हो ना अशिक्षित का राहायचंय?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ

दरम्यान या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखाहून अधिक व्ह्यू आहेत आणि ३८०० हून अधिक रिट्विट्स आहेत. नेटिझन्सना लहान मुलाची समस्या आपलीशी वाटत असल्याने अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मुलांना रडू येईल इतका अभ्यास करायला लावणे हे चुकीचं आहे, शाळेला अभ्यासक्रम बनवतानाच याचा विचार करायला हवा असेही अनेकांनी या व्हिडिओवर म्हंटले आहे तर काहींनी आपल्या लहानपणीच्या आठवणी व आईवडिलांचा मार कसा खाल्ला याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला असा काही अनुभव आहे का? कमेंट करून नक्की सांगा.