Viral Video: शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा काळ खूप लाखमोलाचा असतो. प्रत्येक इयत्तेत नवीन अभ्यासक्रम, विषय, शिक्षक, मित्र-मैत्रिणी भेटतात आणि मजामस्तीही करायला मिळते. सुरुवातीला नकोशी वाटणारी शाळा शालेय शिक्षण संपताना हवीहवीशी वाटू लागते. आपल्यापैकी अनेकांनी लहान असताना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला असेल किंवा शाळेतून घरी येण्यासाठी रडले असतील. आता अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तो रडताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गेला असून यावेळी तो शाळेतून घरी जाण्यासाठी त्याच्या शिक्षिकेकडे विनवणी करत आहे.

विद्यार्थी म्हणतो, मला गोळ्या घ्यायच्या आहेत, मला खोकला झालाय, घरला सोडा

शिक्षिका म्हणते, मग गोळ्या घेतल्यावर शाळेत बसणार का?

विद्यार्थी म्हणतो, शाळेत नाही बसणार, घरीच बसणार मी!

शिक्षिका म्हणते, घरीच बसणार मग शाळा कोण शिकणार?

विद्यार्थी म्हणतो, मला आता सोडा जाऊन मी लगेच येतो तुमच्याकडं, संध्याकाळी येतो.

शिक्षिका म्हणते, संध्याकाळी शाळा सुटणार मग येऊन बसणार का तू? इथं कोणीच नसतं.

विद्यार्थी म्हणतो, हा बसणार, लगेच येतो मी… सरळ एका रस्त्यानं जातो.

त्यानंतर शिक्षिका त्याला ABCD म्हणायला सांगते, पण तो पुन्हा घरी जाण्याचा हट्ट करतो. या दोघांचे संभाषण पुढे बराच वेळ चालू राहते. सध्या हा शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण करून देणारा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manyapatil.22 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने लिहिलंय की, “जाऊदे मॅडम, सोडा त्याला.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “लयचं चाणाक्ष बुद्धीचं बाळ आहे राव, हे मोठं होऊन आई-वडिलांचे नाव नक्कीच मोठं करणार.”