Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करीत असतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका चिमुकलीचा डान्स खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘उई अम्मा’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकली कोल्हापुरी हलगीच्या ठेक्यावर नाचताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली मराठमोळ्या कोल्हापुरी हलगीच्या तालावर नाचताना दिसतेय. या गाण्यावरील डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. तिचा हा सुंदर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “खूप भारी”, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप छान नाचली”, तर आणखी एकाने लिहिलेय, “एक्स्प्रेशन्सही कमाल आहेत”, तर आणखी एकाने लिहिलेय, “मस्त डान्स”.