scorecardresearch

VIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं

या व्हिडीओमध्ये एक विचित्र माणूस एटीएमसमोर उभा असतो. पण शेवटी जे कळतं ते फार धक्कादायक होतं.

VIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं
(Photo: Twitter/ UB1UB2 Southall)

एक वेळ अशी होती की लोकांना पैसे काढण्यासाठी बॅंकेत रांगा लावाव्या लागत होत्या. पण आता एटीएम आल्यानंतर माणसांना कधीही आणि कुठेही पैसे काढण्याची सोय झालीय. पण आता एटीएम मशीनपुढेही मोठ-मोठ्या रांगा लागतात. या एटीएममशीने लोकांना देखील बदलले. आता भलेही बॅंकामध्ये रांगा लावण्याची गरज पडत नसली तरी एटीएमच्या रांगेत अशी काही लोक भेटून जातात की त्यांना पाहून आधीची बॅंकेची रांग परवडली असंच म्हणावंसं वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक विचित्र माणूस एटीएमसमोर उभा असतो. पण शेवटी जे कळतं ते फार धक्कादायक होतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस काळे कपडे आणि डोक्यावर टोपी घालून एटीएमसमोर उभा आहे. हा व्यक्ती बराच वेळा झाला तिथेच उभा असतो. अनेकदा तुमच्यासोबतही असंच घडलं असेल. काही व्यक्ती एटीएममध्ये इतका वेळ घेतात की वाट पाहून कधी कधी वैताग येतो. त्यावेळी रांगेत थांबलेल्यांसाठी परिस्थिती दयनीय होते आणि वाट पाहण्याशिवाय कोणता पर्याय नसतो. नेमकी अशीच परिस्थिती या व्हिडीओमध्ये घडलीय. हा व्यक्ती भरपूर वेळ तिथून काही हलण्याचं नाव घेत नाही. त्याला पाहून लोक त्याच्या मागे रांग देखील लावताना दिसत आहे.

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

इतका वेळ होऊनही रांगेत उभे असलेले लोक मोठ्या संयमाने हा व्यक्ती वळून पाहण्याची वाट पाहत असतात. पण हा व्यक्ती काही तिथून हलण्याचं नाव काही घेत नाही. शेवट या रांगेत उभ्या असलेल्या एका तरूणाचा संयम सुटतो आणि त्याला विचारपूस करण्यासाठी पुढे येतो. सुरूवातीला तो लांबून हात करून त्याला लवकर करा असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याही वेळेहा हा व्यक्ती साधं त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणून हा तरूण थोडं पुढे जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते सत्य समोर आलं ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

आणखी वाचा : या महिलेला महाकाय अजगराने गुंडाळलं, VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले!

एटीएमसमोर उभा असलेला हा व्यक्ती नसून एक पुतळा होता, हे कळल्यानंतर तरूणाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होता. आपल्यासोबत कुणीतरी विनोद केलाय, हे या तरूणाच्या लक्षात आलं. त्यानंतर तो हा पुतळा घेऊन बाजूला करतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडीपुढे आडवा आला महाकाय साप, मग या व्यक्तीने हाताने उचलून फेकला नेमकं त्याचवेळी…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पूजा करता करता मुलाने पंडीतबरोबर केलं असं काही की पाहून पोट धरून हसाल !

हा व्हिडीओ यूकेचा आहे आणि तो ब्रिटीश रिटेल बँक टेस्कोच्या कॅशपॉईंटच्या बाहेर शूट करण्यात आला आहे. याचा व्हिडीओ UB1UB2 Southall नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३८.५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या